महिलेची प्रसुती फुटपाथवर होताच पोलीस धावून आले मदतीला,
अलंकार चौकात फुटपाथवर झाली महिलेची प्रसुती,
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : काल मध्यरात्रीच्या वेळी पुणे रेल्वे स्टेशन येथील अलंकार चौकात फुटपाथवर एका महिलेची प्रसुती झाली,
बंडगार्डन पोलीस ठाण्याकडील पुणे स्टेशन चौकीच्या मार्शलला नियंत्रण कक्षाकडून कॉल आला की, तात्काळ अलंकार चौकात जा.
त्याप्रमाणे पुणे स्टेशन पोलीस चौकीचे मार्शलचे पोलीस कर्मचारी अविनाश गोसावी व सुंदर्डे असे अलंकार चौकात पोहोचले.
त्यांच्या निदर्शनास आले की, एक महिला प्रसुती झाली आहे. तिला तातडीने वैद्यकीय मदत हवी आहे.
त्यांनी लागलीच १०८ क्रमांकावर फोनकरून, ॲम्बुलन्स मिळविण्याचा प्रयत्न केला.
परंतु १०८ क्रमांक हा बिझी लागत असल्याने पोलीसांनी १०८ कॉल करायचे प्रयत्न सुरू ठेवत ससुन हॉस्पीटल गाठले.
सीएमओनां भेटुन ॲम्बुलन्स व वैद्यकीय मदत मिळते का पाहिले.
परंतु ससुन हॉस्पीटलकडील ही ॲम्बुलन्स उपलब्ध झाली नाही. पुन्हा १०८ ला कॉलकरून ॲम्बुलन्स मागणी केली. व महिलेची प्रसुती झाली असल्याचे सांगितले.
ॲम्बुलन्स येईस्तोवर महिलेची आवश्यकता असल्याने, पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस कर्मचारी स्वाती थोरात यांना अलंकार चौकात बोलावुन घेतले.
काही वेळातच १०८ ॲम्बुलन्स अलंकार चौकात आली, त्यामध्ये सदर महिलेस व तिच्या बाळास बसवुन ससुन हॉस्पीटल येथे उपचारकामी पाठविण्यात आले.
महिलेला व नवजात बाळाला लागलीच उपचार मिळाल्याने त्यांना जिवनदान मिळाले.
महिलेला अधिक माहिती विचारली असता. ती महिला (रा. प्राणपुर, ता. बेला, जि.गया बिहार) असे असल्याचे सांगितले.
ती तिच्या भावा बरोबर पुण्यात आली असुन, भाऊ तिला सोडुन कोठे तरी निघुन गेल्याचे तिने सांगितले आहे.
सदरील कामगिरी ही बंडगार्डन पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अविनाश गोसावी,
महिला पोलीस कर्मचारी स्वाती थोरात यांनी केली असल्याची माहीती मिळाली.
तात्काळ मार्शलचे पोलीसांनी वैद्यकीय मदत मिळवून दिल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.