महिला दिनानिमित्त फरासखाना वाहतूक विभाग कायमस्वरूपी महिलांच्या हाती..
Women’s Day: महिला दिनानिमित्त फरासखाना वाहतूक विभाग कायमस्वरूपी महिलांच्या हाती..

Women’s Day news : police news24 : पुणे : जागतिक महिला दिना निमित्त जगभरात अनेक उपक्रम साजरे केले जात आहे.
त्याच पार्श्वभूमीवर अनेक संस्थांकडून उपक्रम हाती घेतले जात असून, पुण्यातील गजबजलेल्या लाल महाल ते दत्त मंदिरापर्यंत महिला वाहतूक नियमांचं काम पाहणार आहेत.
या उपक्रमास सुरुवात झाली असून, एखादा विभाग महिलांच्या हाती असलेलं, देशातील पहिलाच वाहतूक विभाग ठरला आहे.
या अशा अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून विशेष पोलीस विभागाचे कौतुक केले जात आहे.
शहरातील वाहतूकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. त्यात मध्यवस्थीची वाहतूक कायमच डोकेदुखी असते. त्यात व्यापाऱ्याच्या दुकानांमुळे प्रचंड गर्दी असते.
कायमच परिसरात वर्दळ असते. कामानिमित्त दररोज हजारो वाहनचालक मध्यवस्थीत येतात. तसेच, सकाळी आणि सायंकाळी परिसरातील वाहतूक सुरळित ठेवणे,
बेशिस्तांना शिस्त लावणे, , विनाहेल्मेट दुचाकीस्वार, पार्किंग प्रश्न , झेब्रा क्रॉसिंग, ट्रीपलसीट यासह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्याविरुद्ध
कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम यांनी महिला दिनानिमित्त रविवारपासून पुणे फरासखाना वाहतूक विभाग कायमस्वरूपी महिलांच्या हाती सोपविला आहे.
निवडणुकीच्या कामांमध्ये हयगय केल्याने दोनशे शिक्षकांवर गुन्हे दाखल
पथकात 36 महिलांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक स्वाती थोरात या इन्चार्ज आहेत.
महिला पोलीस निरीक्षक स्वाती थोरात , सहायक पोलीस निरीक्षक एस. पी. जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक के. बी. म्हस्के यांच्यासह 36 महिलांकडून वाहतूकीचे नियोजन केले जाणार आहे,
अशी माहिती वाहतूक विभागाचे अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिली.या उपक्रमा बाबत फरासखाना वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षक स्वाती थोरात म्हणाल्या की,
‘पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्या आदेशानुसार श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर, लाल महाल आणि दत्त मंदिर हा पुणे शहरातील गजबजलेला परिसर आहे.
या परिसरात मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ आहे. या ठिकाणी महिलांची सर्वाधिक वर्दळ असल्याने,
त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या विभागात महिला वाहतूक पोलीस नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
या अनोख्या उपक्रमामुळे महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निश्चित निर्माण होणार आहे,’
असं फरासखाना महिला वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षक स्वाती थोरात यांनी सांगितले.
VIDEO NEWS :चौकास Sanvidhan नाव देण्यास अडथळे आणणाऱ्यावर कडक कारवाईची मागणी
Pingback: (Murder of a friend) कोंढव्यात व्याजाच्या पैशामुळे मित्राचा खून