पोलीस निरीक्षकांच्या पगारातून दरमहा १० हजार कपात करण्याचे आदेश

Police inspector News : विरारमधील दोन भावांच्या मृत्यू‌ प्रकरणात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी दंड.

/police-inspector-fined-ten-thousand

Police inspector News : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस इस्माईल शेख,

creat a new website 9999 ₹creat a new website 4999 ₹Digital visiting card

यांना पगारातून २ वर्षांसाठी दहमहा १० हजार रुपयांची कपात करण्याची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

त्यांच्यावर विरारमधील दोन भावांच्या मृत्यू‌ प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचा ठपका आहे.

Create your website rs 4999 and spread your work _ name around the world at home mk (3)digital visiting cardCreate your website rs 9999 and spread your work _ name around the world at home mk (2)

पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम यांनी शेख यांच्यावर विरार प्रकरणात पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत ही शिक्षा सुनावली.

खंडणी मागणा-या 12 वर्षीय मुलाच्या खुनातील आरोपींना अटक

युनूस शेख हे विरार पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी असताना त्यांनी विकास झा

याचा हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी वसई यांच्याकडे सादर केला होता.

हा प्रस्ताव सादर करताना विकास झा याच्याविरुद्ध दाखल नसलेल्या केवळ नावात साम्य असलेल्या ३ अदखलपात्र गुन्ह्यांचा समावेश केला.

वसई येथील मुनाफ बलोच याच्या हस्तक्षेपाने प्रभावित होऊन प्रस्तावाबरोबर जोडायची कागदपत्रेही पूर्वग्रहदूषित हेतूने प्रेरित होऊन वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर केला.

विकास झा याने वसई उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर १० नोव्हेंबर २०१७ रोजी स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केली,

भावाला न्याय मिळावा यासाठी २ महिने प्रयत्न केला यानंतर विकासचा भाऊ अमित झा याने देखील २० जानेवारी २०१८ रोजी उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल.

याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांना मिळाल्यानंतर त्यांनी इतक्या गंभीर प्रकाराची माहिती वरिष्ठांना वेळेत दिली नाही असा त्यांच्यावर आरोप आहे.

गांजा विक्री करणाऱ्याला कोंढवा पोलिसांनी केली अटक

तसेच अमित झा याचा मृत्यूपूर्व जबाब नोंदवण्यासाठी जबाबदार पोलीस अधिकाऱ्यास न पाठविता कनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्याला पाठविले, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले.

विरारमध्ये ८ नोव्हेंबर २०१७ रोजी ही घटना घडली होती. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख आणि इतरांवर गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणात सीआयडीने युनूस शेख यांना मार्च २०१८ मध्ये अटक केली होती.

या प्रकरणात अपर पोलीस अधीक्षक रायगड यांची विभागीय चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

त्यांनी केलेल्या चौकशीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख दोषी आढळले.

सध्या शेख पुण्यातील येरवाडा येथे रुजू असल्याने हा चौकशी अहवाल पुण्यात पाठविण्यात आला.

पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी या विभागीय चौकशीच्या अहवालाचे निष्कर्ष लक्षात घेऊन

पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याबद्दल युनूस इस्माईल शेख यांच्या पगारातून २ वर्षे दरमहा १० हजार रुपये कपात करण्याची शिक्षा सुनावली.

या संदर्भात शेख यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

हडपसर मधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कोरोना पेशंटची लूट ?
telegram
digital visiting cardCreate your website rs 9999 and spread your work _ name around the world at home mk (2)Create your website rs 4999 and spread your work _ name around the world at home mk (3)