खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस पोलिसांनी शिताफीने केले अटक

Murder case Swargate : युनीट ३ कडून आरोपीस अटक

creat a new website 9999 ₹Digital visiting cardcreat a new website 4999 ₹

Murder case Swargate : नागेश दगडू गुंड (वय ३७ वर्षे रा. केरुळ ता.तुळजापुर जिल्हा उस्मानाबाद)

नागेश दगडू गुंड हे ३ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ११/३० ते१२/०० च्या दरम्यान तूळजापुर येथून बसने स्वारगेट येथे येऊन त्यांचा मित्र कमलाकर शरनु घोडके याची वाट पाहत थांबले होते.

Advertisement

ते मित्रा सोबत कोथरुड येथे जाणार होते.त्याच वेळी अज्ञात इसमाने त्याच्या जवळ येऊन त्याच्या जवळील पैसे,व इतर ऐवजाची मागणी केली.

नागेश दगडू गुंड ने चोरटयास पैसे व इतर ऐवज न दिल्याने व प्रतिकार केल्याने संशयीत चोरटयाने त्यास कोयत्याने वार करुन जबर जखमी करुन त्याच्या जवळील रोख रक्कम व मोबाईल घेऊन फरार झाला होता .

सदरील माहिती पोलिसांना मिळताच पोलीस व नागरीकांनी नागेशला ससून हॉस्पिटल मध्ये नेत असता तत्पुर्वीच त्यांचा मृत्यू झाला (murder case swargate).

Advertisement

वाचा : पुण्यात १८ गावठी पिस्तूल, २७ काडतूससह ६ जणांची टोळी गजाआड

सदर घटनेबाबत चोरीच्या उद्देशाने कोयत्याने मारुन अज्ञात चोरटयाने खुन केल्याचा गुन्हा (स्वारगेट पो.स्टे गु.र.नं.१६१६/२०२० भा.दं.वि.कलम ३०२,३९७,३४)

अन्वये दाखल असून त्याचा तपास स्वारगेट पोलिस स्टेशन करीत असून समांतर तपास गुन्हे शाखेकडून चालू होता.

Advertisement

सदरील गुन्ह्याचा समांतर तपास चालू असताना पोलिस.हवालदार संतोष क्षीरसागर यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,

सदरचा गुन्हा हा ऋषिकेश कामठे (रा.लोकमान्य कॉलनी,कोथरुड,पुणे) याने केला आहे.

ऋषिकेश कामठे हा कचरा कोथरुड डेपो येथे थांबला आहे,

Advertisement

या बातमीवरून त्यास तेथे जाऊन ताब्यात घेऊन त्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे काबुल केले,

तसेच त्याने येरवडा पोलिस स्टेशन च्या हद्दीत हि एक गुन्हा केल्याचे उघड झाले आहे.

वाचा : कोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,

नमूद आरोपी हा तसेच सिंहगड पोलिस स्टेशन गु. र. न. २४३९/२०२० क. ३९४,३४ गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी आहे.

Advertisement

सदर आरोपी कोथरुड पोलिस स्टेशन गु.र.नं. १२७ /२०१९ भा.द.वि. कलम ३०७,३२३,३२४,५०७,५०४,५०६ मध्ये जामिनावर असून यापूर्वी त्याच्या वर जबरी चोरी,घरफोडी,दुखापतीचे, चोरीचे खालील प्रमाणे एकूण १६ गुन्हे दाखल आहेत.

१) कोथरुड पो.स्टे. गु.र.नं. ५३/२०१६ भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८०
२) कोथरुड पो.स्टे. गु.र.नं. ४५४/२०१६ भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८०,३२७
३) अलंकार पो.स्टे. गु.र.नं. ०२/२०१९ भा.द.वि. कलम ३८०,३४
४) कोथरुड पो.स्टे. गु.र.नं. १०३/२०१७ भा.द.वि. कलम ३७९
५) कोथरुड पो.स्टे. गु.र.नं. १२७ /२०१९ भा.द.वि. कलम ३०७,३२३,३२४,५०७,५०४,५०६
६) मिरज पो.स्टे. गु.र.नं. १९२ /२०१८ भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८०,३४
७) कोथरुड पो.स्टे. गु.र.नं. २७४ /२०१ भा.द.वि. कलम ३०७,३२३,३२४,५०७,५०४,५०६
८) कोथरुड पो.स्टे. गु.र.नं. ३०८ /२००३ भा.द.वि. कलम ३८०,३४
९) कोथरुड पो.स्टे. गु.र.नं. १७६ /२०११ भा.द.वि. कलम ३९२,४११,३४
१०) कोथरुड पो.स्टे. गु.र.नं. २७४ /२०१८ भा.द.वि. कलम ३९४,३४
११) कोथरुड पो.स्टे. गु.र.नं. ३०८ /२००३ भा.द.वि. कलम ३८०,३४
१२) शिवाजीनगर पो.स्टे. गु.र.नं. ८५ /२०१७ भा.द.वि. कलम ४६१,३८०
१३)बंडगार्डन पो.स्टे. गु.र.नं. २९ /२००३ भा.द.वि. कलम ३७९
१४) कोथरुड पो.स्टे. गु.र.नं. १८५/२०१२ भा.द.वि. कलम ३८०,३४
१५) कोथरुड पो.स्टे. गु.र.नं. ४२३/२०१३ भा.द.वि. कलम ३९४,३४
१६) कोथरुड पो.स्टे. गु.र.नं. ३२३७/२०११ म.पो.कायदा कलम १२२(क)

सदरची कामगिरी युनीट ३ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शना खाली ,

Advertisement

पोलीस उप निरीक्षक किरण अडागळे, पो.हवादार . संतोष क्षिरसागर, मेहबूब मोकाशी,

पोलिस नाइक अतुल साठे,पोलिस नाइक.विल्सन डिसोझा, यांच्या पथकाने केली असल्याची माहिती मिळाली .

Advertisement

One thought on “खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस पोलिसांनी शिताफीने केले अटक

Comments are closed.

%d bloggers like this: