पुण्यामधील चंदननगर भागातील गुन्हेगाराचा खून,

Pune chandan nagar : पुणे शहरात खूनाचे सत्र सुरूच.

Pune chandan nagar : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

Digital visiting cardcreat a new website 9999 ₹creat a new website 4999 ₹

पुणे शहरात सध्या खूनाचे सत्र सुरूच असून रोज कुठे ना कुठे खूनाची घटना घडत असल्याने पुणे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चंदननगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्ड वरील असलेला गुन्हेगार शैलेस दत्तात्रय घाडगे वय ३५ याचा खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Advertisement

घाडगे विरोधात खुन, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

वाचा > शिवसेनेचे दीपक मारटकरचा खून करणारे जेरबंद

युवान आय टी पार्क जवळील नैवेद्यम हॉटेल शेजारील मोकळ्या जागेत हा प्रकार सोमवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास लक्षात आला.

Advertisement

घाडगे विरोधात गंभीर गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी त्याला तडीपार केले होते. तसेच प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली होती.

घाडगे याच्यावर हल्लेखोरांनी वार करुन डोक्यात दगड घालून त्याचा खुन केल्याचे निष्पन्न झाले आहे.

सकाळी फिरायला आलेल्या लोकांना हा प्रकार लक्षात आला.त्यानंतर त्यांच्यापैकी एकाने पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती कळविली.

Advertisement

चंदननगर पोलीस ठाण्याकडून पुढील तपास सुरु आहे.

वाचा > पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचे नव्या पोलीस आयुक्तांसमोर आव्हान

Advertisement

One thought on “पुण्यामधील चंदननगर भागातील गुन्हेगाराचा खून,

Comments are closed.

%d bloggers like this: