नो पार्किंगमधील वाहने उचलणा-या टोईंग वाल्यांकडून पुणेकरांची लूट?

संग्रहित फोटो

नो पार्किंगमधील वाहने उचलणा-या टोईंग वाल्यांकडून पुणेकरांची लूट.?

आवाजावी आकारली जातेय रक्कम,

MH-४३-AJ- १७४० या चारचाकी वाहनात बसून विना पावती पोलीसांनी आकारली रक्कम,

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : पुण्यातील टोईंग वाल्यांकडून नागरिकांना अरेरावीची भाषा वापरणे, आवाजावी रक्कम आकारणे, वाहनांचे नुकसान करणे, असे रोजचेच प्रकार घडत असल्याने आणि वरिष्ठांची डोकेदुखी वाढल्याने जुन्या टोईंग टेम्पो बंद करण्यात आली.

creat a new website 4999 ₹Digital visiting cardcreat a new website 9999 ₹

तर पारदर्शकता आणण्यासाठी पुणेकरांवर जास्त रक्कमेचे टोईंग चार्जेस लादण्यात आले. विदर्भ इन्फोटेक प्रा लि.या कंपनीला ठेकेदार पद्धतीने नो पार्किंगमधील वाहने उचलण्याचा ठेका देण्यात आला.

तेही CCTV कॅमेरेच्या निगराणीखाली. परंतु पारदर्शकता आणण्याचा फक्त आणि फक्त वाहतूक पोलिसांनी देखावाच केला आहे का.

Advertisement

विदर्भ इन्फोटेक प्रायव्हेट कंपनी कडील कामगारांना वाहतूक पोलिस हताशी धरुन पुणेकरांची लूट होत असताना पुणे पोलिस आयुक्त के व्यंकटेशम कारवाई करतील का? असा प्रश्न पुणेकरांकडून विचारला जात आहे.

हकीकत अशी की पुण्यातील एका सामाजिक कार्यकर्ते सादिक शेख यांची दुचाकी वाहन तुळशीबाग येथून नो पार्किंगमधून उचलून नेण्यात आली. सदरील वाहन अल्का चौकात( लाकडी पूल) नेऊन टोईंग वाल्यांनी ठेवली होती.

सामाजिक कार्यकर्ते सादिक शेख त्या ठिकाणी पोचताच MH०३ CD १२४५ टोईंग टेम्पो वर काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या दुचाकी वाहन संदर्भात विचारणा करताच त्यातील एकाने ७५०० ची मागणी केली.

Advertisement

व ते भरलायावरच गाडी सोडण्याचा पवित्रा घेतला. त्या कार्यकर्त्याने कशाचे ऐवढे पैसे विचारले असता अरेरावी केली. परंतु ७५०० कशाचे त्याचा खुलासा करत लेखी देता का असे विचारल्यावर समोर लागलेली कार MH-४३-AJ-१७४० मध्ये साहेब बसले आहे.

त्यांच्याशी बोला, साहेबांकडे गेले असता ७५०० ची पावती ४००० हजारांवर आली. ती रक्कम भरणारच नाही जो पर्यंत कशाची रक्कम आकारताय हे सांगा.

त्यावर कार मध्ये बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने ४००० हजाराची पावती ४०० रुपये करुन पावती न देता दुचाकी सोडल्याचे कार्यकर्ते सादिक शेख यांनी पोलीस न्यूज 24 ला सांगितल्याने सदरील घटना उघडकीस आली.

Advertisement

टोईंग टेम्पोवर CCTV फुटेज बसून ही नागरिकांची लूट कशी काय होत आहे? यात पोलीसांचाही सहभाग दिसून येत आहे? दिवसभरात अश्या किती नागरिकांची लूट करून मलाई लाटली जात असेल? यात वाटणी कोणाकोणाची? ह्या साखळीत कोणाकोणाचा सहभाग आहे? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. पोलीस आयुक्त संबंधिता विरोधात कारवाई करणार का? याच्यावर नागरिकांचे लक्ष राहणार आहे.

%d bloggers like this: