खंडणी मागणा-या 12 वर्षीय मुलाच्या खुनातील आरोपींना अटक

Murder case : कोंढवा पोलिसांची जबरदस्त कामगिरी

Kondhwa police 4 Criminaal arrested on 12-year-old's murder case

Murder case : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुण्यात १२ वर्षाच्या मुलाचा खून करून पळून गेलेल्या आरोपींना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.

creat a new website 4999 ₹creat a new website 9999 ₹Digital visiting card

सदरील खून हा खंडणी मागण्यावरुन झाल्याचे समोर आले आहे.

लक्ष्मी पार्क जंगल परिसरात हेवन पार्क सोसायटी रस्त्यावरवरील १२ वर्षाच्या मुलाचा दगडाने ठेचून खुन केल्याचा प्रकार समोर आला होता.

कोंढवा पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणून चौघांना ताब्यात घेऊन वानवडी पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

वानवडी येथील रोहित गौतम बनसोडे (वय २७, रा. उंड्री) अजय विजय गायकवाड (वय २२, रा. कृष्णानगर, महंमदवाडी रोड)

श्रीकांत भिमराव साठे (वय २०,रा. कृष्णानगर), अक्षय अनिल जाधव (वय २०, रा.आझादनगर, वानवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

अजान झहीर अन्सारी (वय १२ वर्ष, रा. शिवनेरी,कोंढवा खुर्द) असे खुन झालेल्या मुलाचे नाव आहे. सदरील घटना १० जुलै रोजी उघडकीस आली होती.

अन्सारी याच्या आईने आपला मुलगा हरविल्याची तक्रार कोंढवा पोलिसांकडे दिली. कोंढवा पोलीस याचा तपास करीत होते.

त्यात अजान अन्सारी हा लहान असूनही अनेक गुन्हे करीत होता.रोशन अजित सिंग यांची पान टपरी असून अन्सारी याने त्यांच्याकडे खंडणी मागितली होती.

रामटेकडी मध्ये तरुणाचा खून

पैसे दिले नाही तर टपरी जाळून टाकीन अशी धमकी दिली होती.सतिश गायकवाड यालाही अन्सारी विषयी राग होताच.

Create your website rs 9999 and spread your work _ name around the world at home mk (2)digital visiting cardCreate your website rs 4999 and spread your work _ name around the world at home mk (3)

त्यातून रोहन अजित सिंग व रोहित बनसोडे यांनी सतिश गायकवाड याच्या सांगण्यावरून ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता अशोका म्युज समोरुन दुचाकीवरुन त्याला पुण्यधाम रोडने महंमदवाडी येथून गणेशनगर मैदान येथे नेले.

तेथे सतिश गायकवाड, अजय गायकवाड, श्रीकांत साठे, अक्षय जाधव हे चौघे आले. त्या सर्वांनी अन्सारी याला लक्ष्मी पार्क जंगल परिसरात नेले.

तेथे दारु पाजून त्याच्या डोक्यात व चेह्यावर दगड मारुन खुन केला. त्यातील सतिश गायकवाड हा फरार आहे.

या खुनामध्ये कोणतेही धागे दौरे नव्हते. अन्सासी याला दोघे जण दुचाकीवरुन घेऊन जात असतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले.

परंतु त्यावरील वाहनाची नंबरप्लेट दिसत नव्हती. अशावेळी पोलीस शिपाई किशोर वळे यांना त्यांच्या बातमीदाराने अन्सारीला ज्या गाडीवरुन नेले होते.

ती गाडी साई मेडिकलसमोर असल्याची माहितीमिळाली.

पोलिसांनी ही गाडीची तपासणी केल्यावर सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेल्या दुचाकीवर श्री हे स्टिकर याही दुचाकीवर असल्याने ही गुन्ह्यातील गाडी असल्याचे निष्पन्न झाले.

गांजा विक्री करणाऱ्याला कोंढवा पोलिसांनी केली अटक

या दुचाकीला नंबरप्लेट नव्हते. ती रोशन अजितसिंग याच्या घराबाहेर उभी असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली,

चौकशीत हा सर्व प्रकार उघडकीस आल्याची माहिती कोंढवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.

वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड, महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चेतन मोरे,

सुशिल धिवार, संतोष नाईक, सुशिल पवार, निलेश वणवे ,किरण मोरे ,उमाकांत स्वामी, गणेश आगम, सुरेश भापकर यांनी ही कामगिरी केली.

VIDEO : महायुतीतील इतर घटक पक्ष तुमच्या बैलगाडीत बसलेले आहेत त्यांचं काय ?

telegram
Create your website rs 4999 and spread your work _ name around the world at home mk (3)Create your website rs 9999 and spread your work _ name around the world at home mk (2)digital visiting card