पुण्यात धुळवड खेळताना दोन गटांमध्ये तुफान राडा..
Dhulvad fights in Pune : पुण्यात धुळवड खेळताना दोन गटांमध्ये तुफान राडा

Dhulvad fights in Pune : police news 24 : पुणे : काल संपूर्ण राज्यात धुळवड साजरी होत असताना पुण्यात मात्र होळीच्या सणाला गालबोट लागलं आहे.
धुळवड खेळताना दोन गटांमध्ये तुफान राडा झाला आहे. यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली.
व एकमेकांचा पाठलाग करत तरुणांकडून दगडफेकही करण्यात आली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सदरील घटना हि चतुःशृंगी परिसरातील खैरेवाडी येथे ही घडली.
कोंढव्यात व्याजाच्या पैशामुळे मित्राचा खून
चतुःशृंगी परिसरात दोन गटांमध्ये धुळवड खेळत असताना काही कारणास्तव भांडण झालं.
नेमकं कोणत्या गोष्टीवरुन हे भांडण झालं हे कारण समजू शकलं नाही.
मात्र यानंतर दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
सीसीटीव्हीत तरुणांचा एक गट दगडफेक करत असल्याचं दिसत आहे.
तसंच रस्त्यावर उभ्या गाड्यांची तोडफोडही करत आहेत. यानंतर समोरील गटातील तरुण हातात काठ्या घेऊन त्यांचा पाठलाग करताना दिसत आहेत.
या घडलेल्या प्रकारामुळे परिसरात तणावाचं आणि भीतीचं वातावरण आहे.
सदर घटनेचा अधिक तपास चतुःशृंगी पोलिस करत आहेत.
VIDEO NEWS : Hadapsar येथिल D P रस्त्यावर बांधकाम व्यवसायिकाने बांधले वॉलकंपाऊड
Pingback: (coronavirus news ) पुण्यात सॅनिटायझर , मास्क पुरेशा संख्येत उपलब्ध