बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारा गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

Bank ATM : १२ तासात खडक पोलिसांनी गुन्हेगाराला केले अटक

bank-atm-burglar-arrested
संग्रहित

Bank ATM : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : २४ तारखेच्या रात्री शिवाजीरोड वरील राष्ट्रभुषण चौका-जवळील स नं ५५७ शुक्रवार पेठ , गरूडा कॉम्प्लेक्स, पुणे.

creat a new website 9999 ₹creat a new website 4999 ₹Digital visiting card

येथील स्टेट बँकेचे ए.टी.एम मध्ये कोणी तरी अज्ञात चोरट्याने प्रवेश करून तेथील भिंतीमध्ये असलेले सी.सी.टी.व्ही कॅमेरे तोडून नुकसान केले,

व मशीन स्क्रु ड्रायव्हरच्या मदतीने उचकटण्याचा प्रयत्न करून कॅश चोरून नेण्याचा प्रयत्न केला.

digital visiting cardCreate your website rs 9999 and spread your work _ name around the world at home mk (2)Create your website rs 4999 and spread your work _ name around the world at home mk (3)

याची फिर्याद सुयोग महादेव परमाळे (वय ३७ वर्ष रा. स नं. २० धनकवडी, गगनगिरी कॉलनी, फ्लॅट नं.२, साईसिध्दी चौक, पुणे )

यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हयाचा तपास तांत्रीक माध्य माच्या सहाय्याने सुरू झाला.

बराटेला मदत करणाऱ्या त्या तिघांना जामिन

पोलीस कॉन्स्टेबल राकेश क्षीरसागर व समीर माळवदकर यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती प्राप्त झाली की ए.टी.एम मशीनमधील कॅश चोरण्याचा प्रयत्न भाग्यवंत याने केला असुन तो सध्या नातुबाग मैदान येथे थांबलेला आहे.

अशी माहिती मिळाल्यानंतर खडक पोलीस ठाण्यातील तपास पथकाने सदर ठिकाणी जावुन छापा टाकुन अमित रविंद्र भाग्यवंत, (वय ३५ वर्षे, रा. आंबेडकर नगर किनारा बस स्टॉप जवळ गल्ली न.- २ दापोडी, पुणे.)यास पकडण्यात आले .

त्याच्याकडे दाखल गुन्हयाच्याबाबत तपास केला असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली ,

सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासुन १२ तासाच्या आत आरोपीला अटक करुन खडक पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला आहे.

पुढील गुन्हयाचा तपास अजीज बेग पोलीस हवालदार खडक पोलीस स्टेशन पुणे हे करीत आहेत.

क्राईम ब्रँचच्या नावाखाली १५ लाखांची खंडणी वसूल

डॉ.संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ व मिलींद पाटील,

सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशन चे भरत जाधव,

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे , पोलीस निरीक्षक ( गुन्हे) तपास पथकाचे प्रभारी सहा पोलीस निरीक्षक सुशिल बोबडे,

पोलीस कर्मचारी,अजिज बेग, विनोद जाधव, गणेश सातपुते संदिप पाटील, राकेश क्षीरसागर, समीर माळवदकर,

रोहन खैर,रवी लोखंडे, योगेश जाधव, इम्रान नदाफ यांचे पथकाने कारवाई केली.

भाजपा युवा मोर्चा ने शरद पवार यांना जय श्रीराम लिहिलेले 1000 पत्र पाठविले

telegram
Create your website rs 4999 and spread your work _ name around the world at home mk (3)digital visiting cardCreate your website rs 9999 and spread your work _ name around the world at home mk (2)