पुणे शहरातील आर्थिक गुन्हे शाखेची जबरदस्त कारवाई..! शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ.

शिक्षण क्षेत्र गुन्हे शाखेच्या रडारवर.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे शहर आहे. या शहरातच विद्येचे माहेरघराच सुरंग लावण्याचा प्रयत्न काहि जणांनी केला आहे.

creat a new website 9999 ₹creat a new website 4999 ₹Digital visiting card

पुणे शहरातील आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हे दाखल करुन घरावर छापे टाकल्याने शहरात एका प्रकारे मोठी खळबळ उडाली आहे.

बनावट शिक्षक भरतीची मान्यता तयार करुन त्या खऱ्या असल्याचे भासवून शासनाची फसवणूक करणाऱ्या प्रकरणात पुणे आर्थिक,

Advertisement

गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणाचा मुख्य सुत्रधार आणि मुख्याध्यापक संभाजी शिरसाट याला अटक करण्यात आली आहे.

त्याच्यासह आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी शिरसाट याला आता न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

याप्रकरणी भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक राजेंद्र बाबासाहेब साठे वय ४६ यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Advertisement

संभाजी शिरसाट याच्यासह सुबोध शिक्षण संस्थेचे सचिव गौरव अशोक कदम, तात्कालीन वेतन पथक अधीक्षक भविष्य निर्वाह निधी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असाच एक प्रकार हडपसर सय्यदनगर येथील शाळेने घडवीला आहे. त्या संस्थेच्या शाळेने ५ ते ७ वी चे तुकडी मंजुरी मान्यता,

खोटे आदेश दाखवून वर्ग चालविले जात असल्याचे सजग नागरिक टाईम्सने उघडकीस आणून एका महिन्यापुर्वी तक्रार केली होती.

Advertisement

परंतु वानवडी पोलीसात तक्रार करूनही अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सांगितले जात आहे.

हडपसर सय्यदनगर मधील बोगस तुकडी मंजुरी बाबत त्वरित गुन्हा दाखल होणार का?

वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार करून ही अद्यापही गुन्हा का दाखल झाला नाही? त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

Advertisement

%d bloggers like this: