पुण्यात १८ गावठी पिस्तूल, २७ काडतूससह ६ जणांची टोळी गजाआड

6 criminal arrested : हडपसर तपास पथकातील पोलिसांची कामगिरी

6 criminal arrested : पोलीस न्युज 24 :

creat a new website 9999 ₹Digital visiting cardcreat a new website 4999 ₹

पुणे :- गावठी पिस्तूल विकण्यासाठी आलेल्या ६ जणांच्या टोळीला गजाआड करण्यात आले.

ही कारवाई पोलीस नाईक नितीन मुंढे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे हडपसर पोलिसांनी केली.

Advertisement

या कारवाईत १८ गावठी पिस्तूल, २७ जिवंत काडतूस, चोरीची मोटारसायकल,

असा एकूण ५ लाख ६८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे परिमंडळ ५ चे उपायुक्त सुहास बावचे यांनी सांगितले.

6 criminal arrested in Pune with 18 gavthi pistols, 27 cartridges

कोरोना संकट काळात गैरधंद्यांवर लक्ष ठेवून असताना हडपसर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या

Advertisement

पोलीस नाईक नितीन मुंढे यांना गावठी पिस्तूल विकण्यासाठी आलेल्या इसमांची माहिती मिळाली.

त्या माहितीच्या आधारे हडपसर पोलिसांच्या पथकाने पुण्यातील फुरसुंगी-कानिफनाथ वस्ती येथे सापळा लावून ६ इसमांना ताब्यात घेतले.

त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कमरेला गावठी पिस्तूल आढळून आले.

Advertisement

या इसमांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपापली नावे अरबाज रशिद खान (वय २१), सुरज चिंचणे ऊर्फ गुळ्या (वय २२),

कुणाल शेजवळ ऊर्फ यश (वय १९), जयेश राजू गायकवाड ऊर्फ जय (वय २३),

विकास भगत तीर ऊर्फ महाराज (वय२८), शरद बन्सी मल्लाव (वय२१) अशी सांगितली.

Advertisement

वाचा : घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक, सोने चांदी जप्त,

या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३, ७, ८ (२५) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) १३५ सह

भादंवि कलम ३४ नुसार गुन्हा दाखल करून ६ जणांच्या टोळक्याला अटक करण्यात आली.

सदर पिस्तूल आरोपींनी मध्य प्रदेश सीमाभागातून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाल्याचेही उपायुक्त सुहाल बावचे यांनी सांगितले.

Advertisement

ही कारवाई सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण,

परिमंडळ ५ चे उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते,

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, पोलीस निरीक्षक हमराज कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने,

Advertisement

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युसूफ पठाण, हवालदार राजेश नवले, हवालदार प्रताप गायकवाड,

पोलीस नाईक सैदोबा भोजराव, विनोद शिवले, नितीन मुंढे,गोविंद चिवळे, प्रवीण उत्तेकर,

पोलीस शिपाई अकबर शेख,शशिकांत नाळे, शाहीद शेख, प्रशांत टोणपे, अमित कांबळे, पोलीस शिपाई नरसाळे आदी पथकाने केली.

Advertisement

video पहा : ऑक्सिजन सिलेंडर असणारा टेम्पो चोरट्यांनी पळविला

2 thoughts on “पुण्यात १८ गावठी पिस्तूल, २७ काडतूससह ६ जणांची टोळी गजाआड

Comments are closed.

%d bloggers like this: