क्राईम ब्रँचच्या नावाखाली १५ लाखांची खंडणी वसूल
Name of crime branch : काही भांमटे पोलीस असल्याचे बतावणी करून लूट करत असल्याचे प्रकार समोर येत आहे.

Name of crime branch : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : सध्या कोरोना संक्रमणामुळे शासनाने लॉकडाउनचे निर्बंध घातले आहे. त्यात नियमावली ही निश्चितच केली आहे.
काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पाहून काही भांमटे पोलीस असल्याचे बतावणी करून लूट करत असल्याचे प्रकार समोर येत आहे.
असाच एक प्रकार कोंढवा येथे घडला आहे.
हकीकत अशी की प्रकाश भाटी (वय ३२ वर्षे,रा.कोंढवा खुर्द,पुणे धर्मावत पेट्रोल पंपाचे मागे) मासाळ नावाच्या व्यक्तीचे गोडाऊन आहे.
त्या गोडाऊन मध्ये फिर्यादी यांचे किरणा मालाचे दुकान असुन त्या ठिकाणी विनोद उर्फ बाळा लक्ष्मीण गोडांबे(वय ३३,रा.दत्त मंदिर गल्ली पाषाण पुणे)
हा त्याच्या तीन मित्रांसोबत येऊन पोलीस असल्याची बतावणी करुन फियादी यांचे गोडाऊनमध्ये गेला,
व त्यांना आम्ही क्राईम ब्ँच पुणे पोलीस स्टाफ कमीशनर ऑफिस येथुन आलो आहोत असे सांगितले.
लॉकडाऊन मध्ये तुझे गोडाऊन चालु कसे काय ठेवले आहे असे म्हणुन कारवाई करण्याची भिती दाखवुन फिर्यादीकडुन १५ लाख रुपयांची खंडणी घेवून गेले.
सदरील गुन्ह्याचा तपास कोंढवा पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक सी एम मोरे करत आहे.
LOCKDOWN च्या काळामध्ये cyber crime मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ
Pingback: (Ramtekdi Murder news 2020)रामटेकडी मध्ये तरुणाचा खून,
Pingback: (Bank ATM) बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारा गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात